Shina Bora Murder Case

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब

1011 0

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. यामध्ये शीना बोराच्या मृतदेहाचा (Shina Bora Murder Case) सांगाडाच गायब झाल्याचे समोर आले आहे. मृतदेहाच्या सांगाड्यातील जळलेली हाडं सीबीआयला सापडत नाहीयेत. सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये सीबीआयने साक्षीदार हजरच केले नाहीत. तसंच सीबीआय जप्त केलेल्या सांगाड्यातील काही हाडं कोर्टात सादर करणार होती.

या हाडांच्या आधारावर सरकारी जेजे रुग्णालयाततील अनाटॉमी विभागाचे साहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. मात्र ही हाडं सापडतच नसल्याची सीबीआयच्या वकिलांकडून कोर्टामध्ये देण्यात आली. ही हाडे सापडत नसल्यामुळे तब्बल 3 वेळा याप्रकरणाची सुनावणी तहकूब करण्यात आली होती.

शीना बोरा हत्या प्रकरणावर आली वेब सिरीज
काहीच दिवसांपूर्वी शीना बोरा हत्या प्रकरणावर एक वेब सीरिजही आली होती. या वेब सीरिजविरोधात सीबीआयने कोर्टात धाव घेतली होती. वेब सीरिज प्रकाशित केली तर त्याचा केसवर परिणाम होईल, असा दावा सीबीआयकडून केला गेला होता, पण कोर्टाने ही वेबसीरिज रिलीज करण्यास परवानगी दिली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!