Sharad Mohol

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

571 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतारदऱ्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला. प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.आता पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार याच दोघांनी 17 डिसेंबर रोजी एकावर गोळ्या झाडल्या होत्या. शरद मोहोळचा खून करण्यासाठी मदत न केल्याने त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. भूगाव परिसरात ही घटना घडली होती.

काय घडले होते नेमके?
फिर्यादी अजय सुतार (वय 27, रा. भूगाव) याला आरोपी नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळच्या खुनात सहकार्य करण्यासाठी बोलावून घेतले होते.17 डिसेंबर रोजी नामदेव कानगुडे याने अजय सुतार याला आपल्या भूगाव येथील राहत्या घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्याला आम्ही शरद मोहोळचा खुन करणार असून त्यासाठी मदत करण्यास सांगितले. मात्र अजय सुतार याने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याने अजय याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी साहिल पोळेकर याने त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी फिर्यादीच्या पायाला लागली. तर दुसरी गोळी त्याला चाटून गेली.

यानंतर आरोपींनी अजय सुतार याला रुग्णालयात नेले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने याविषयी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी यापूर्वी गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.जर ही घटना तेव्हाच उघडकीस आली असती तर आज शरद मोहोळचा नक्की जीव वाचला असता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Punit Balan : पुनीत बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतिगृहासाठी 14 कोटीचं अर्थसहाय्य

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!