Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

1089 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं ? याची माहिती आता समोर आली आहे.

मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील हत्येनंतर दीड तास आरोपींसोबत होते. त्यांनी एकत्र प्रवास केला. आरोपींना वकील खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली. त्यानंतर न्यायालयानं या दोन्ही वकिलांच्या पोलीस कोठडीमध्ये 11 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान यावेळी आरोपी पोलिसांना शरण येणार होते असा दावा या वकिलांकडून करण्यात आला, मात्र हा दावा पोलिसांकडून फेटाळण्यात आला आहे.

या प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी दिनांक 15 डिसेंबरला भेटले, या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन केला. त्यानंतर पाच जानेवारीला शरद मोहळची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्यावर वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान त्यांना जाऊन भेटले. त्यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide