Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

2890 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. दुपारी सव्वाएकच्या सुमारास शरद मोहोळ याच्यावर चार राऊंड फायर करण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल कोथरुड आणि ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र आता शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे तो व्यक्ती?
शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ याच्यावरचा हल्ला त्याच्याच साथीदाराने केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शरद मोहोळला मारणारा त्याचाच साथीदार निघाला

कोण होता शरद मोहोळ?
शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता. 2007 साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला, यावेळी शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता. भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली होती. 2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॉकीजजवळ खून केला. लवळेगावचा सरपंचाचं किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये शरद मोहोळ प्रमुख आरोपी होता. 2012 साली जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महम्मद कातील सिद्दीकीची जेलमध्ये बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा दाखल

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!