Sharad Mohol CCTV : शरद मोहोळ हत्या प्रकरणात समोर आले दुसरे CCTV फुटेज

3807 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या प्रकरणात आणखी एक CCTV व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि कशाप्रकारे गुन्हेगारांनी संधी साधून शरद मोहोळची हत्या केली. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये खटका उडाला होता. घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते. संधी मिळताच त्यांनी मोहळ याच्यावर गोळीबार केला. मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात गोळ्याचे चार राउंड फायर करण्यात आले.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली. यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयीत स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!