'सतीश वाघ यांचेही अनैतिक संबंध'; आरोपी पत्नी मोहिनी वाघचे गंभीर आरोप

SATISH WAGH CASE : ‘सतीश वाघ यांचेही अनैतिक संबंध’; आरोपी पत्नी मोहिनी वाघचे गंभीर आरोप

593 0

भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (satish wagh) यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून हत्येची सूत्रधार असलेल्या पत्नी मोहिनी वाघ यांनी मृत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर आपल्या पतीचेही अनैतिक संबंध असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे ,अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे या आरोपींना अटक केली. या आरोपींकडं कसून चौकशी केल्यानंतर सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ यांनीच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.

सतीश वाघ यांचेही अनैतिक संबंध

मोहिनी वाघ यांचे पूर्वीचा भाडेकरू असलेल्या आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय जावळकर बरोबर अनैतिक संबंध होते. या संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी त्यांनीच पाच लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणली. त्याप्रकरणी मोहिनी वाघ यांना अटक झाली असून 30 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. मात्र कोठडीत असलेल्या मोहिनी वाघ यांनी चौकशी दरम्यान आपल्या मृत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सतीश वाघ यांचे देखील दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यामुळेच ते आपला मानसिक छळ करायचे. पण एकदा दारू पिऊन मारहाण करायचे. घरातील आर्थिक व्यवहारांपासून जाणून बुजून मला दूर ठेवायचे. वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला मी कंटाळले होते’, असं त्यांनी चौकशीत सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!