CHANDAN NAGAR POLICE NEWS: चंदननगरमधील खूनाच्या गुन्हाचा उलगडा झालाय.
एका महिलेला आय लव यू म्हणणं तरुणाच्या जीवावर बेतलंय.
SHARAD MOHOL याच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला PUNE CRIME BRANCH कडून अटक
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
ही घटना पुण्यातील चंदनगरमध्ये (CHANDAN NAGAR POLICE NEWS) घडली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
मात्र या आरोपींपर्यंत पोहोचण्याआधी पोलिसांना मोठा तपास आणि चौकशी करावी लागली.
YAVATMAL ZP SCHOOL NEWS: यवतमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिल्या माहितीनुसार,
चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला.
दरम्यान हा मृतदेह साईनाथ उर्फ खलबली दत्तात्रय जानराव याचा असल्याचं उघड झालं.
त्याचबरोबर त्याला दारूचं व्यसन असल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता उपस्थित झाली होती.
मात्र त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं.
त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
याच तपासातून सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर आणि समर्थ उर्फ पप्पू शर्मा ही दोन नावं समोर आली.
पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
मयत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य वालेकर याच्या चुलतीची छेड काढली होती.
इतकंच नव्हे तर तो तिला ‘आय लव्ह यू’ देखील म्हणाला होता. त्याचाच राग आदित्यच्या डोक्यात होता.
त्यामुळेच त्याने मित्राच्या मदतीने साईनाथला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.
ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडून निघून गेले होते.
LATUR RAKSHABANDHAN SPECIAL: अपघातानंतर पत्नीनं साथ सोडली अन् बहिण भावाच्या मदतीला धावली
या खूनाच्या गुन्ह्यातील विशेष गोष्ट म्हणजे आरोपी सोन्या उर्फ आदित्य वाल्हेकर
यानीच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती संबंधित लोकेशनला पडला असल्याची माहिती दिली होती.
मात्र पोलिसांच्या तपासा दरम्यान त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं.
त्यामुळेच पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.