भाजपचे आमदार योगेश टिळेकर (yogesh tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली. ही हत्या आर्थिक किंवा राजकीय वादातून झाली असल्याची पोलिसांना आणि कुटुंबीयांनाही शक्यता वाटत होती. त्याच अँगलने पोलीस तपासही करत होते. मात्र या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. सतीश वाघ (satish wagh) यांची पत्नी मोहिनी वाघ (mohini wagh) हीच त्यांच्या हत्येची मुख्य सूत्रधार निघाली. मोहिनीचे आपला पूर्वीचा भाडेकरू असलेल्या अक्षय जवळकर (akshay javalkar) बरोबर प्रेम संबंध होते. याच प्रेम संबंधातून तिने अक्षयला पाच लाखांची सुपारी दिली आणि अक्षय ने आपल्या साथीदारांसह मिळून सतीश वाघ यांची हत्या केली. मात्र या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी असलेला अक्षय जवळकर कोण आहे, वाचा सविस्तर.
कोण आहे अक्षय ?
• अक्षय जवळकर हा पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे. त्याचं लग्न झालं असून त्याला आपत्यही आहेत.
• 2001 साली अक्षय हा नऊ वर्षांचा असताना त्याचे आई-वडील सतीश वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. त्यावेळी अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे. अक्षय ही त्यांना मदत करायचा.
• त्यावेळी सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही अक्षयच्या वयाचा असल्यामुळे त्या दोघांची चांगली मैत्री झाली. या दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं.
• पुढची काही वर्ष सगळं काही सुरळीत चालू होतं. मात्र अक्षय वयात आल्यानंतर त्याचे आणि मोहिनीचे प्रेम संबंध जुळले. हे अनैतिक संबंध गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सुरू होते.
• या प्रेम संबंधांची कुनकुन सतीश वाघ यांना लागली. त्यांनी लागलीच आपल्या भाड्याचं घर खाली करून दुसरीकडे राहायला जायला सांगितलं. त्यानुसार अक्षय च्या आई-वडिलांनी जवळच्याच भागात मात्र दुसरीकडे नवीन घर भाड्याने घेतलं.
• 2016 मध्ये अक्षयचं लग्न झालं. त्यानंतरही अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले.
• याची माहिती सतीश वाघ यांना असल्यामुळे वारंवार त्यांचे आणि मोहिनीचे वाद व्हायचे. पण एकदा सतीश वाघमोहिनी यांना मारहाण करायचे.
• घरातील आर्थिक व्यवहारांपासून मोहिनीला दूर ठेवलं जात होतं.
• त्यामुळेच अखेर कंटाळलेल्या मोहिनी वाघ यांनी प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढायचा ठरवलं.
• नोव्हेंबर 2024 मध्ये तिने प्रियकर अक्षय जवळकर ला पाच लाखांची सुपारी दिली.
• 9 डिसेंबरला अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केली.
• 26 डिसेंबरला मोहिनी वाघला अटक करून 30 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रियकराला सुपारी देऊन पत्नीनेच केली सतीश वाघ यांची हत्या; वाचा A टू Z स्टोरी
https://www.topnewsmarathi.com/crime/satish-wagh-was-killed-by-his-wife-mohini-wagh-and-her-lover/