Satara Saspade News: Tension in Village After Girl’s Murder in Satara District

SATARA SASPADE NEWS:सातारा जिल्ह्यातील मुलीच्या खून प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण

183 0

SATARA SASPADE NEWS: सातारा जिल्ह्यामध्ये एका १३ वर्षीय शाळकरी मुलीच्या क्रूर हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील सासपडे गावात घडलेल्या (SATARA SASPADE NEWS)या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राहुल बबन यादव या नराधमाला ताब्यात घेतले आहे, मात्र या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.

Wildlife Smuggling Shock at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

सासपडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सातवीत शिकणारी ही १३ वर्षांची मुलगी शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी परतली. तिचे वडील घरात झोपले असल्याने (SATARA SASPADE NEWS) तिने चावी घेऊन घरात प्रवेश केला. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तिचा भाऊ घरी आला तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला, पण घरात बहीण नव्हती. त्याने वडिलांना ही गोष्ट सांगितल्यावर दोघांनी घरात पाहिले असता, मुलगी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि तोंडाच्या डाव्या बाजूला गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृत मुलीच्या घराशेजारी राहणारा ३७ वर्षीय (SATARA SASPADE NEWS) राहुल बबन यादव हा संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. राहुल यादव हा व्यसनी असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याचा दारूच्या व्यसनाचा गैरफायदा घेत त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्याला जोरदार विरोध केला आणि आरडाओरडा सुरू केला. लोक जमा होतील या भीतीने घाबरलेल्या राहुलने घरात ठेवलेले दगडी जाते उचलून मुलीच्या डोक्यावर क्रूरपणे वार केले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

HONEY TRAP CASE THANE POLICE NEWS: महिला असल्याचा भास करून आमदाराशी चॅट; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली. “संशयिताला आमच्या ताब्यात द्या किंवा आमच्यासमोर फाशी द्या”, अशी मागणी करत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला घेराव घातला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक राजीव नवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस. वाळवेकर यांनी अतिरिक्त पोलीस पथक तैनात केले. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी शांतता राखत मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पाडले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस. वाळवेकर करत आहेत, तर आरोपी राहुल यादव याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

Share This News
error: Content is protected !!