SATARA NEWS : साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली. एका 18 वर्षांच्या मुलाने एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावत वेठीस धरलं. दिवसा ढवळ्या असा प्रकार घडल्यामुळं एकच खळबळ उडाली. अशा विकृतींचं करायचं काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
*TOP NEWS MARATHI : लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ, विरोधकांनी अवघ्या दोनच मिनिटात बंद पाडलं सभागृह
काल संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरातील बसाप्पा पेठ करंजे परिसरात एक शाळकरी मुलगी रस्त्यातून घरी जात असताना एका तरुणानं तिला (SATARA NEWS) बाजूला बोलवून घेतले. चल पळून जाऊ… असं म्हणत धमकावलं. या मुलीने नकार दिल्यानंतर थेट तिच्या गळ्याला चाकू लावून त्या मुलीला वेठीस धरलं. दोघांमध्ये आरडाओरडा सुरू झाल्यानंतर तिथे लोक जमा झाले. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा तरुण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट हा तरुण तुम्ही सगळे इथून जा असं वारंवार सांगत होता. यावेळी जमावातील महिलांनी सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कुणी जवळ आलात तर हिला ठार करीन असं सुद्धा तो ओरडत होता. तेवढ्यात पाठीमागच्या भिंतीवरून एका धाडसी स्थानिक युवकान खाली उडी मारून दबक्या पावलाने त्याच्या जवळ जाऊन चाकू पकडला. त्याचवेळी इतरांनीही झडप घालून या मुलाला जमिनीवर पाडला आणि त्याच्यावर तुटून पडत त्याला बेदम मारहाण केली.
सगळ्यात आधी त्या मुलीला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. या सगळ्या झटापटीत मुलीच्या गळ्याला थोडासा चाकूचा स्पर्श झाला आणि ती किरकोळ जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मुलाने यापूर्वी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. या मुलाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात POCSO कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचं समोर आलं आहे. वय केवळ १८ असताना चाकू सारखं धारदार हत्यार घेऊन एका मुलीला वेठीस धरण्याची विकृती नेमकी येतेच कुठून? “नाही याचा अर्थ नाही…!” हे कधी समजणार?
BREAKING NEWS: Vice President Jagdish Dhankhar resigns: जगदीश धनकड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
शाळकरी मुली या मानसिक विकृतीचा बळी ठरत असल्याचं अलीकडच्या अनेक प्रकरणांमधून दिसतय… मग ते काल घडलेल्या साताऱ्यातलं प्रकरण असो किंवा सांगलीतील अल्पवयीन मुलीची आत्महत्या असो…आज या घटना या मुलींसोबत घडतायत… उद्या तुमच्या आमच्या मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न सध्याच्या पालकांसमोर उभा ठाकलाय.