Satara News

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

600 0

सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ऊस तोडणी मुकादम असणाऱ्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर तब्बल दीड तास त्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. रात्री उशीरा कोरेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.

काय घडले नेमके?
सोमवारी दि. 4 रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चिमणगाव ते जरंडेश्वर साखर कारखान्याकडून स्प्लेंडर मोटारसायकलवरून (एमएच-23- एस-1997) ऊस तोडणी मुकादम महादेव लक्ष्मण जगताप (वय 55) आणि भाऊ बाळू लक्ष्मण जगताप (वय 46) (दोघेही रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) हे दोघे सख्खे भाऊ ऊसतोडणी मजुरांच्या टोळीला डबे देऊन चिमणगावकडे ऊस तोडणी आणि अन्य कामासाठी निघाले होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने तेथून जाणाऱ्या प्रवाशांना हे दोघे जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी त्यांच्याच मोबाईलवरुन शेवटचा कॉल आलेल्या व्यक्तीला संपर्क करून अपघाताची माहिती दिली. काही वेळात एकंबे येथून टोळीतील कामगार आले. त्यांनी शासकीय रुग्णवाहिका, खासगी रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपलब्ध झाल्या नाहीत.खासगी वाहनही लवकर उपलब्ध झाले नाही. दीड तास वाहनाचा शोध घेऊनही त्यांना वाहन मिळाले नाही.अक्षरश: हे दोघे जखमी अवस्थेत दीड तास पडले होते. अखेर एका खासगी वाहनाने दोघांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हवालदार राहुल कुंभार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!