सातारा : साताऱ्यामधून (Satara Accident) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये मांढरदेवीचे दर्शन घेवून घरी जात असताना एका दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत दांम्पत्य उंब्रज येथील रहिवाशी होते. वाई सातारा रस्त्यावर पाचवड गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
काय घडले नेमके?
गुरूवारी दुपारी 3 वाजनेच्या दरम्यान मांढरदेवीचे दर्शन घेवून आपल्या उंब्रज गावाकडे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याच्या स्पेंल्डरने दुचाकी नंबर MH 50 H 6324 हि पाचवड गावानजीक रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रक MH 10 CQ 6129 ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेले पती पत्नी जागीच ठार झाले.
सोमनाथ नानासो चव्हाण (वय 46) व त्यांची पत्नी रेखा सोमनाथ चव्हाण (वय 40, रा. लक्ष्मीनगर उंब्रज) अशी मृत पती -पत्नीची नावे आहेत. नातेवाईकांनी भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ओळखल्यानंतर रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदनाची कार्यवाही सुरु होती. या अपघाताची सखोल चौकशी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे करीत आहेत. तर या अपघाताचा तपास PSI विशाल भंडारे हवालदार आप्पासाहेव कोलवडकर करीत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी
Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण
Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?
Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा
Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला