VALMIK KARAD : वाल्मीक कराडला सरेंडर झाल्याचा फायदा होणार; सहज जामीन मिळणार ?

SANTOSH DESHMUKH ON VALMIK KARAD: वाल्मीक कराडला तुरुंगात भेटणारी व्यक्ती कोण?

764 0

संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीला शरण आला. स्वर्गीय संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने वाल्मीक कराडला तुरुंगात सुख सुविधा मिळत असल्याचा आरोप केला. वाल्मीक कराडला तुरुंगात जावून भेटणारा कोण? असा सवाल उपस्थित केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींपैकी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतला असून इतर तीन जण फरार आहेत. नुकतच पोलिसांकडून सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी फरार घोषित केले असून त्यांची माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीस ही जाहीर केलं. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर खंडणी प्रकरणातील आरोपी असणारा वाल्मीक कराड 22 दिवसानंतर पुण्यात सीआयडीला शरण आलं. पुण्यात सीआयडीने त्याची तब्बल पाच तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला केज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. केज न्यायालयाने वाल्मीक कराडला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराड याला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची तक्रार मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय पंडितराव देशमुख यांनी पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार केली आहे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद देशातील संसदेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत उमटले. त्यानंतर या प्रकरणांमध्ये राज्य शासनाकडून SIT गठीत करण्यात आली. त्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड पुण्यातील CID कार्यालयात शरणागती पत्करली. त्याला केज न्यायालयाने पंधरा दिवसाची कोठडी सुनावली. परंतु कोठडीच आहे त्याला सुख सुविधा मिळत असल्याचा आरोप केला जातोय. आधीच या चौकशी बाबत अनेक सवाल उपस्थित होत असताना, वाल्मीक कराडला खरंच कोठडीत सुख सुविधा मिळत आहेत का? असा आणखी एक सवाल उपस्थित झालाय.

मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांना वाल्मीक करायला तुरुंगात सुख सुविधा मिळत असल्याचा आरोप करत लेखी तक्रारही दिली. परंतु त्यावेळी तुरुंगात घडलेला एक प्रकारही त्यांनी सांगितला आहे.खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंचाचे पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते. मला विचारले तू इथे काय करतोयस, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं, तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटलास आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला आणि आरेरावी केली आणि माझ्याशी संतापजनक वागला. आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुजत घातली. आणि आपण सीआयडीसोबत आलो आहोत, असं सांगितलं.
रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच, त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच सांगितलं, तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं. ज्या ठिकाणी आरोपी आहेत अश्या ठिकाणी असे लोक येतात कसे, खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेणे, अशी माझी तक्रार आहे. अश्या लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा, अशी शंका धनंजय देशमुख यांनी उपस्थित केली.

खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंचाचे पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते. मला विचारले तू इथे काय करतोयस, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं, तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटलास आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला आणि आरेरावी केली. अशी तक्रार पत्राद्वारे संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा एवढा संवेदनशील मुद्दा असताना कोठडीत एखादा व्यक्ती वाल्मीक कराडला कसा भेटू शकतो असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

Share This News
error: Content is protected !!