क्राईमब्रेकिंग न्यूज

SANTOSH DESHMUKH CASE| विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

विष्णू चाटेवर खंडणी आणि खून असे दोन्ही आरोप असून याप्रकरणी आता विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी केज न्यायालयाने ठोठावली आहे विष्णू चाटेची रवानगी ही गेवराई पोलीस स्टेशन मधून बीड पोलीस ठाण्यात होणार आहे.

दरम्यान विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला अशा चर्चा आता सुरू झाल्यात मात्र खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी विष्णू चाटे चा ताबा घेऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून आजच एसआयटी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून आतापर्यंत सहा जण अटकेत असून कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरारच आहे.

हे ही वाचा

VALMIK KARAD संदर्भातील ‘ती’ शिफारस धनंजय मुंडे यांना होणार भोवणार? नेमकं प्रकरण काय

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

JOIN THIS GROUP ON ALL LATEST UPDATE 

https://whatsapp.com/channel/0029Vb2Z6498F2pHMwM9YA1S