सांगली हादरली! भरदिवसा भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

939 0

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्‍या करण्यात आली आहेयाप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.

सुधाकर खाडे यांच्याकडे सध्या भाजपाच्या उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

खाडे हे पंढरपूर मिरज मार्गावरील राम मंदीराच्या जागेच्या वादातून एका व्यक्तिशी भेटण्यासाठी गेले होते. दोघामध्ये यावरून वाद झाला. या वादातून संबंधित व्यक्तिने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यात खाडे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाला पोलिसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलिस करत आहेत

Share This News
error: Content is protected !!