Sangli Accident

Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

1281 0

सांगली : सांगली जिल्ह्यातून (Sangli Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या लाडक्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात बर्थडे गर्लसह 6 जण जागीच ठार झाले. सांगलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिची 2 वर्षीय मुलगी राजवी हिचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हे कुटुंब कोकळे इथं गेलं होतं. राजेंद्र यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली, पत्नी आणि नाती होत्या. वाढदिवस साजरा करून ते घरी परतत होते. तेव्हा या कुटुंबावर काळानं घाला घातला. तेव्हा तासगाव-मणेराजुरी राज्य महामार्गावर त्यांच्या अल्टो कारचा भीषण अपघात झाला.

त्यांची कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कालव्यात पडली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक एक मुलगी जखमी झाली आहे. मृतांमध्ये राजेंद्र पाटील (वय 60), त्यांची पत्नी सुजाता पाटील (वय 55), मुलगी प्रियांका खराडे (वय 30), नात ध्रुवा (वय 3), राजवी (वय 2), कार्तिकी (वय 1) यांचा समावेश आहे. तर राजेंद्र यांची दुसरी मुलगी स्वप्नाली भोसले (वय 30) ही जखमी झाली आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याने स्वप्नाली ही रस्त्यात कुणीही नसल्याने मदत मिळाली नाही. रात्रभर ती गाडीतच बसून होती. तिला मृतदेहासोबत गाडीतच रात्र काढावी लागली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide