PCMC POLICE BIRTHDAY CELEBRATION: पोलीस स्टेशनसमोर बर्थडे सेलिब्रेशन; गुंडांबरोबर बर्थडे सेलिब्रेशन पोलिसांना पडलं महागात

PCMC POLICE BIRTHDAY CELEBRATION: पोलीस स्टेशनसमोर बर्थडे सेलिब्रेशन; गुंडांबरोबर बर्थडे सेलिब्रेशन पोलिसांना पडलं महागात

481 0

सांगवी पोलीस (sangavi police station) ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना गुंडांबरोबर बर्थडे सेलिब्रेशन करणं महागात पडलं आहे. गुरुवारी प्रवीण पाटील (pravin patil) यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने पोलीस स्टेशनच्या समोरच पिंपरी चिंचवड मधल्या काही गुंडांनी त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशन्स ऑफ प्लॅनिंग केलं. पोलीस ठाण्याच्या समोरच टेबल टाकला. त्यावर डबल टायर केक अर्थात दुमजली केक, फायर गन आणि फटाकांच्या माळा लावण्यात आल्या. बारा- पंधरा टोळके आणि काही पोलीस सहकारीही जमले आणि बरोबर बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतिषबाजी करत बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ फोन किंवा कॅमेराने शूट न करता, चक्क ड्रोन ने शूट करण्यात आले. अगदी थ्री सिक्सटी डिग्री अँगलने या सेलिब्रेशनचा शूटिंग करण्यात आलं. आणि अवघ्या एका दिवसात मोठमोठ्या रील स्टारला लाजवेल असं प्रोफेशनल एडिटिंग करण्यात आलं. पोलीस अंमलदार प्रवीण पाटलांच्या वाढदिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. एवढंच काय तर पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच गुन्हेगारांनी त्यांना शुभेच्छा देणारे स्टेटस आणि स्टोरी टाकल्या. आणि हे सगळं कमी की काय म्हणून प्रवीण पाटलांच्या फोटोला कॅप्शन म्हणून “किंग ऑफ पीसीएमसी” असं लिहिण्यात आलं. ज्यामुळे प्रवीण पाटील हे नक्की पोलीस आहेत की पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांसारखे गुंड आहेत ? हाच प्रश्न सामान्य माणसाला पडतोय.

4 पोलीस निलंबित

मध्यरात्री रस्त्यांवर बर्थडे सेलिब्रेशन करत धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी करण्याविषयीचं निवेदन पुण्यातील वकील ॲड. विकास शिंदे, अनिल जाधव, राहुल सपकाळ, गणेश माने, अस्मिता नेवसे, धनंजय गलांडे आणि मुस्कान नदाफ यांनी आधीच पोलीस आयुक्तांना दिलं होतं. त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. मात्र आता पोलीसही असे प्रकार करणार असतील तर केवळ आश्वासन देऊन काहीही होणार नाही, या सेलिब्रेशन वर कडक निर्बंधच घालण्यात यावेत, अशी मागणी आता पुण्यात येत आहेत. प्रवीण पाटील यांचं हे जंगी बर्थडे सेलिब्रेशन पाहून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे लगेचच ॲक्शन मोडवर आले. त्यांनी तातडीने बर्थ डे बॉय प्रवीण पाटील यांच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचं तडकाफडकी निलंबन केलं. त्याचबरोबर सेलिब्रेशनचा आयोजन करणाऱ्या गुंडांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!