Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

673 0

वाशिम : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Accident) हा अपघाताचे हॉटस्पॉट बनले आहे. आज सकाळी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूला भरधाव कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूला घुसला आहे. कारच्या मागच्या बाजूलाही तडे गेले आहेत.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंजजवळ घडली आहे. अपघातग्रस्त कारने उभ्या ट्रकच्या मागील बाजूने धडक दिल्यानं अर्ध्याहून अधिक कारचा पुढील भाग ट्रक खाली घुसला.

अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातील असण्याची शक्यता असून मृतकांची अद्याप ओळख पटली नाही .अपघातग्रस्त कार मधून तिघे जण प्रवास करत होते. या अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!