SAMBHAJI NAGAR FULABRI NEWS:पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून हुंड्यासाठी पैशांचा तगादा, घरगुती हिंसाचार, हुंड्याच्या छळातून अमानुष मारहाणीची प्रकरणे उघडकीस येत आहेत
छत्रपती संभाजी नगरमध्ये अशाच प्रकारचे धक्कादायक घटना घडली असून एका विवाहितेला माहेरहून पैसे आण म्हणून बांधून ठेवून चटके देण्यात आले SAMBHAJI NAGAR FULABRI NEWS
SAMBHAJI NAGAR FULABRI NEWS: छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला दोरीने बांधून दिले शरीरावर चटके
राज्यभर महिला अत्याचारांच्या घटनेने मोठी वाढ झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चौकावाडीत एक धक्कादायक प्रकार घडला
माहेरहून पैसे घेऊन म्हणून 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून ठेवून बेदम मारहाण करण्यात आली
एवढ्यावरच न थांबता तिला शरीरावर चटके देण्यात आले.
या अमानुष प्रकारात विवाहिता गंभीर जखमी झाली. पीडित विवाहितेने केलेल्या आरोपानुसार , पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख, आणि रिजवाना इम्रान शेख यांनी शारिरीक व मानसिक छळ केला…
माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून तिला दोरीने घरात बांधून अमानुष मारहाण केली. मारहाणीच्या वेळेस शरीरावर चटके दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे
या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तिघां विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
DEHUROAD ATM NEWS: देहूरोडमध्ये एटीएम फोडत असतानाचा चोर आणि पोलीस आले समोरासमोर… पुढे काय झालं पाहा?
पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे.फुलंब्रीच्या चौकावाडी येथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे घरगुती हिंसाचार आणि छळवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे..
राज्यभरात सातत्याने होत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटना कधी थांबणार? आणि महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकार आता कठोर कोणता कायदा आणणार का? हे पाहण्यात महत्त्वाचं असणार आहे…