Rupesh Marne arrest: Key member of Gaja Marne gang finally nabbed; arrested from Mulshi

Rupesh Marne arrest: गजा मारणे टोळीतील मुख्य सदस्य रुपेश मारणे अखेर जेरबंद; मुळशीतून अटक

69 0

Rupesh Marne arrest: गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि कोथरूड हाणामारी प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गजा मारणे टोळीतील प्रमुख सदस्य रुपेश मारणे याला अखेर कोथरूड पोलिसांनी (Rupesh Marne arrest) अटक केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शिवजयंती मिरवणुकीदरम्यान कॉम्प्युटर इंजिनिअर देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याप्रकरणी रुपेश प्रमुख सूत्रधार होता. सोमवारी रात्री उशिरा मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरातून त्याला विशेष पथकाने ताब्यात घेतले.

Illegal e-cigarette seizure in Bavdhan: बावधनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; एका तरुणावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजा मारणे हा टोळीचा म्होरक्या सध्या तुरुंगात असल्याने, बाहेरच्या टोळीचे आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवहार रुपेश मारणे याच्याकडून हाताळले जात होते. १९ फेब्रुवारी रोजी कोथरूड (Rupesh Marne arrest) परिसरात शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना हा वादग्रस्त प्रसंग घडला. भाजपचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र जोग हे मिरवणुकीच्या मार्गावरून आपली दुचाकी बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असताना रुपेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याला हटकले. यातूनच शाब्दिक चकमक झाली, जी लवकरच हाणामारीत बदलली.

JALGAON EKNATH HOUSE THEFT : एकनाथ खडसे यांच्या घरात चोरी , ८६८ ग्रॅम आणि ३५ हजार रुपये सोने लंपास 

रुपेश आणि त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हा हल्ला दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी झाल्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ (Rupesh Marne arrest) माजली होती. विशेषतः, एका सामान्य नागरिकावर टोळीच्या सदस्यांकडून झालेला हा हल्ला अतिशय संतापजनक होता. घटनेची गभींरता लक्षात घेऊन, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Pune traffic problem: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूककोंडी, नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत रुपेशच्या तीन साथीदारांना तत्काळ अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी रुपेश मारणे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. तो सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. अखेर, गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोथरूड पोलिसांच्या एका विशेष पथकाने मुळशीच्या आंदगाव परिसरात सापळा रचला. सोमवारी रात्री रुपेशला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याची कसून चौकशी करून या हल्ल्यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, तसेच त्याचे टोळीतील नेमके कार्य काय होते, याचा तपास कोथरूड पोलीस करत आहेत. रुपेशच्या अटकेमुळे कोथरूड परिसरात टोळीचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!