Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

967 0

महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या बहाण्याने नराधमाने हे पाशवी कृत्य केले. विरोध करणाऱ्या पतीला गळा दाबून बाजूला बसवत तीन वेळा महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

याबाबतची माहिती अशी की, अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर अंध महिला आपल्या अंध पतीसह रात्री पावणेआठ वाजता बसमधून खाली उतरली. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना वाडेगाव इथे जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावर जायचं होतंय. बस अर्धा तास उशिरा असल्यामुळे आणि त्यातच वाडेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणे शक्य नव्हतं. अंध दाम्पत्यमधील महिलेने तिच्या आईला फोनवर आम्ही दिग्रसला येत असल्याची कल्पना दिली. आता दिग्रस परिसरात पाऊस सुरू आहे, तुम्हा दोघांना पोहोचायला रात्र होणार, त्यामुळे उद्या सकाळी या असं घरच्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघांनीही रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान या सर्व गोष्टी मदतीसाठी सोबत आलेला व्यक्ती ऐकत होता. त्यानंतर या दाम्पत्याने त्याच व्यक्तीला रेल्वे स्थानक कुठे आहे? यासंदर्भात विचारलं. रात्रीची वेळ असल्याने तुम्ही कुठे फिरणार, चला मीच तुम्हाला रेल्वे स्थानकावर घेऊन जातोय. असे सांगून त्याने त्या दोघांना एका खुल्या मैदानात घेऊन गेला. आणि तिथे अंध पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन अंध महिलेवर बलात्कार केला. पती अंध असल्यामुळे तो या गोष्टींना विरोध करू शकला नाही.

रात्री बाराच्या नंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही रिक्षात बसून रेल्वे स्थानकाकडे पाठवून दिले, आणि दोघेही दिग्रसला दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. काल सकाळी पती-पत्नी आणि नातेवाईक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला सर्व प्रकाराची तक्रार नोंदवली.

Share This News
error: Content is protected !!