RANJANGAON MIDC NEWS पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत हातावर जय भीम असा टॅटू असलेल्या एका महिलेचा आणि तिच्यासह दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आला होता.
या ट्रिपल मर्डर केस ने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. RANJANGAON MIDC NEWS
RANJANGAON MIDC NEWS: रांजणगावातील तिहेरी हत्याकांडातील आरोपीला अखेर अटक
महिलेच्या मृतदेहाची ओळख अनेक दिवस पटत नसल्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना व्यत्यय येत होता.
मात्र स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने या तिहेरी हत्याकांडाच्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.
SHIRUR NEWS: ‘जय भीम’चा टॅटू, अर्धवट जळालेले तीन मृतदेह; शिरूरमध्ये घडलं रहस्यमयी तिहेरी हत्याकांड
रांजणगाव एमआयडीसी च्या निर्जन रस्त्यावर एका महिलेसह दोन आणि तीन वर्षांच्या दोन मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. महिलेच्या हातावर जय भीम, आर एस, राजरत्न असे टॅटू काढलेले होते. या टॅटूच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आलं.
BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?
आणि जवळपास 21 दिवसांच्या तपासानंतर पोलीस आरोपी पर्यंत पोहोचले. गोरख बोखारे या आरोपीबरोबर ही महिला आपल्या मुलांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बोखारे याचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
त्यात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे खून अनैतिक संबंधातून झाले असून मृत महिला व आरोपी एकमेकांचे नातेवाईक होते.
ही महिला आरोपी प्रियकराच्या मागे लग्नासाठी हट्ट करत होती.
मात्र आरोपीचं आधीच लग्न झालं असल्याने तिच्या या हट्टापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने महिलेसह तिच्या एक आणि दोन वर्षांच्या मुलाला देखील मारल्याचं उघड झालं आहे.
Murlidhar Mohol : पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा – मुरलीधर मोहोळ