धक्कादायक ! ससून हॉस्पिटलमध्ये रंगला पत्त्यांचा डाव

416 0

पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्स
ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 18 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससूनच्या आवारात दिवसाढवळ्या अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या अन्वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.
गुन्हे शाखेचे पोलीस जेव्हा तिथे कारवाई साठी हजर झाले तेव्हा दोन ते तीन जण पोलिसांना पाहून पाहून गेले.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल रामनरेश गुप्ता , किशोर मंजुनाथ तलवार आनंद हनुमंतराव मराठे राहुल काशिनाथ हजारे जावेद चांदखान पठाण ,राकेश गोपाल राठोड, शुभम हरिश्‍चंद्र तळेकर, सचिन सूर्यकांत गुरव, सलमान हुसेन खान, सिध्दप्पा यलप्पा मुळगुंद, अमित मारुती पुजारी, उमेश गोरख सावंत, रफिक अब्दुल शेख, अजय रघुनाथ पवार ,हनुमंत धोंडीबा मोरे ,अक्षय नारायण पाटील ,संतोष गुरुलिंग शेट्टी, आणि शाबीत हसन शेख अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस नाईक अश्विनी केकान यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती सांगितली ती अशी. ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्सच्या आवारात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून अंदर बाहर हा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ताब्यात घेते. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि अठरा मोबाईल असा एकूण एक लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणाऱ्या सर्व विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 अ, 4 अ, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Ranjna Fort

Fort Rangana : रांगणा किल्ल्याजवळील पूल वाहून गेल्याने अडकलेल्या 17 पर्यटकांची अखेर सुटका

Posted by - July 19, 2023 0
कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे ओढे आणि नदी नाले…

…तर नवं सरकार अवैध ठरेल ; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; वाचा आज काय घडले ?

Posted by - February 23, 2023 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनवाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली…

BIG NEWS : विनयभंग केसमध्ये ठाण्याच्या न्यायालयाचा मोठा निर्णय; जितेंद्र आव्हाड यांना..

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांना उपोषण मागे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *