अजमेर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अजमेरमध्ये भीषण रेल्वे अपघात (Railway Accident) झाला आहे. मालगाडीला धडकल्यानंतर साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अजमेरच्या मदार रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एकच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली. लोको पायलटनं ट्रेनला थांबवण्यासाठी इमरजेंन्सी ब्रेक दाबला मात्र ब्रेक न लागल्याने हा भीषण अपघात झाला.
काय घडले नेमके?
या अपघातानंतर साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान या अपघातानंतर पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.