RAIGAD COUPLE NEWS:प्रेम प्रकरणातून झालेली हत्या आणि एका आत्महत्येमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय.
बॉयफ्रेंड ने आपल्याच गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या करत नंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय.
या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरातून उमटत आहेत.RAIGAD COUPLE NEWS:रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या परळी मध्ये ही घटना घडली. राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम या दवाखान्यात पौर्णिमा अनंत देसाई ही तरुणी नर्स म्हणून काम करत होती. ती मूळची देसाईपाडा, सुधागड येथील रहिवासी होती. तिचे दुधानेवाडी परिसरात राहणाऱ्या शेखर संतोष दुधाणे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सारं काही सुरळीत सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू झाले.
मात्र हे वाद इतक्या टोकाला जातील असं तिलाही वाटलं नव्हतं. मंगळवारी 13 मे रोजी पौर्णिमा दवाखान्यात पोहोचली. तिने तिचं कामही सुरू केलं. मात्र तिच्या पाठोपाठ शेखरही दवाखान्यात पोहोचला. आणि त्याने धारदार कोयत्याने थेट पौर्णिमावर वार केले. हे वार इतके जबर आणि खोल होते की या हल्ल्यात पौर्णिमाचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह दवाखान्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. मात्र इतकी अमानुष हत्या केल्यानंतर आरोपी शेखरने दवाखान्यातच स्वतःलाही गळफास लावून घेतला.
त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. ही घटना घडताच हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. स्वतःच्याच गर्लफ्रेंडला मारणाऱ्या या बॉयफ्रेंड ने केवळ स्वतःचं आणि गर्लफ्रेंड नाही तर दोन्ही कुटुंबीयांचं आयुष्य उध्वस्त केलं. त्यामुळेच खून आणि आत्महत्येची ही बातमी राज्यभरात वाऱ्याच्या वेगाने पसरली.
TOP NEWS मराठी : ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहा 24×7
घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पौर्णिमा आणि शेखर यांचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. या दोघांमध्ये सतत वाद होत होते हे चौकशीतून समोर आलं असलं तरीही अद्याप ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अस्पष्ट आहे. प्रेमातील किरकोळ वाद हे थेट हत्या आणि आत्महत्येपर्यंत का गेले हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेच पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तर मयत पौर्णिमा हिच्याबद्दल सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या