PUNE VISHWAS NANGRE PATIL RAID RAVE PARTY तेव्हा रेव्ह पार्टीवर धाड टाकून 280जणांना केली होती अटक

197 0

PUNE VISHWAS NANGRE PATIL RAID RAVE PARTY: एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली.

आणि पुन्हा एकदा पुण्यात रेव्ह पार्टीची चर्चा सुरू झाली. अशा पार्ट्या सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला नव्या नाहीत.

देशात खळबळ उडवणारी पुण्यातली पहिली रेव्ह पार्टी तब्बल 18 वर्षांपूर्वी झाली होती.

सध्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील हे त्यावेळी पुणे ग्रामीणचे अधीक्षक होते.

त्यांना मिळालेल्या एका टिपेवर त्यांनी ही पार्टी कशी उधळून लावली आणि

पुण्यातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी रेड कशी मारली त्याचीच ही स्टोरी…

PUNE VISHWAS NANGRE PATIL RAID ON RAVE PARTY तेव्हा रेव्ह पार्टीवर धाड टाकून 280जणांना केली होती अटक
तारीख होती 4 मार्च 2007… भल्या पहाटे पुण्यातील सिंहगडाजवळ सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळल्याच्या चर्चा वाऱ्याच्या वेगात पसरल्या.

प्रत्येक न्यूज चॅनलवर याच रेव्ह पार्टीच्या लाईव्ह बातम्या सुरू होत्या. या तरुण पोरांनी पुण्याची संस्कृती धुळीस मिळवली, असं म्हणून ज्येष्ठांकडून नावं ठेवली जात होती.

काहींनी रेव्ह पार्टी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता. तर काहींना आदल्या रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती.

पार्टी कधी आणि कशी आयोजित करण्यात आली ?

4 मार्च 2007 ला पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या डोणजे गावातील एका भल्या मोठ्या शेतात ही पार्टी सुरू होती.

खास धूळवडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीचं निमंत्रण ठराविक तरुणांना “ऑर्कुट” व “एसएमएस”द्वारे देण्यात आलं होतं.

पार्टीमध्ये निमंत्रित होती बड्या बापांची बिघडलेली मुलं..

आयटी सेक्टरमध्ये काम करणारे अधिकारी, मोठमोठे व्यवसायिक, खाजगी कंपन्यांचे मालक, राजकीय नेते, आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांचा या पार्टीत भरणा होता.

ही मुलं केवळ पुण्यातील नव्हती तर पिंपरी चिंचवड, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, चंडीगडसह काही परदेशी मुलंही होती. काही एअर होस्टेस तरुणी होत्या.

अनेक जण विमानाने पुण्यात केवळ या पार्टीसाठी आले होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी बक्कळ एन्ट्री फी देखील होती. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या मुलांना या पार्टीची भनकही लागली नाही.

या पार्टीत मद्य, गांजा आणि इतर ड्रग्सची “सोय” केली होती. जवळपास 300 जण या पार्टीत नशेत झिंगाट होऊन बिभस्त पद्धतीने नाचत होते.

नशेच्या वेगळ्याच दुनियेत हरवलेल्या या तरुणांना आपली पुढची सकाळ तुरुंगात जाणार आहे, याची भनकही लागली नाही.

इकडे तरुणाई सो कॉल्ड एन्जॉय करत असताना तिकडे एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला टीप मिळाली…

विश्वास नांगरे पाटलांना टीप आणि पोलिसांची रेड

आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील तेव्हा पुणे ग्रामीणचे अधीक्षक होते.

ते रात्री घरी टीव्ही बघत असताना पुणे शहराचे आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त सुनील फुलारी यांचा फोन आला.

सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टी सुरू आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख निरीक्षक शेषराव सूर्यवंशी यांच्याकडून माहिती मिळालीये.

तातडीने पार्टीवर छापा मारता येतोय का बघा… या एका फोन कॉल वर नांगरे पाटलांनी रेड मारायचं ठरवलं.

मात्र तोपर्यंत ही रेव्ह पार्टी नेमकी काय असते हे स्वतः नांगरे पाटलांनाही माहित नव्हतं.

ज्या इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी ही टीप दिली होती त्यांच्याकडूनच माहिती घेतली. 100- सव्वाशे पोलिसांचं पथक तयार केलं.

रेड मारण्याच्या आधी नांगरे पाटील स्वतः इतर काही अधिकाऱ्यांसह साध्या वेशात पार्टीत सहभागी झाले. पार्टीत नेमकं काय सुरू आहे हे पाहिलं.

या पार्टीत मिसरूडही न फुटलेली मुलं ड्रग्स घेऊन अगदी ट्रान्समध्ये नाचत होती.

बराच वेळ पार्टीचं निरीक्षण केल्यानंतर पोलिसांच्या पूर्ण पथकाला घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले.

डोंगराळ भागातून रानावनातून अंधाऱ्या वाटांमधून रस्ता काढत अगदी शीताफिने सर्व पोलीस पार्टीच्या ठिकाणी पोहोचले.

पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी पार्टीवर रेड मारली. 50 – 100 नाही तर तब्बल 289 जणांना ताब्यात घेण्यात आलं.

RAVINDRA CHAVHAN VISITS PM MODI : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

यामध्ये 29 तरुणींचाही समावेश होता. घटनास्थळावरून पोलिसांनी 17 चिलीम, 100 ग्रॅम चरस, 300 टीन बिअर बरोबरच विविध अमली पदार्थांच्या कॅप्सूल व पावडरही जप्त केल्या.

याबरोबरच म्युझिक सिस्टीम, 45 कार व 29 दुचाकीही ताब्यात घेतल्या. रेड मारल्यानंतरही अनेक जण या पार्टीसाठी येत होते.

मात्र रेडची माहिती मिळताच अनेकांनी वाटेतूनच धूम ठोकली.

ताब्यात घेतलेले तरुण आणि मुद्देमाल घेऊन पोलिसांचं पथक पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात दाखल झालं. आणि पुढील कारवाई सुरू झाली.

Share This News
error: Content is protected !!