PUNE VIMANNAGAR NEWS: पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यांची दहशत समोर आली आहे. विमाननगर परिसरात तरुणावर शस्त्राने हल्ला करत तीन रिक्षा आणि पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली. (PUNE VIMANNAGAR NEWS) या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Sikandar Shaikh Arrest: महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी; सिकंदर शेखनं नेमका काय गुन्हा केला?
पुणे शहरातील विमाननगर भागातील खेसे पार्क परिसरात २९ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तक्रारदार तरुण भावासोबत दुचाकीवरून जात असताना लोहगावच्या दिशेने (PUNE VIMANNAGAR NEWS) आलेल्या एका टोळक्याने त्यांना अडवलं. शिवीगाळ करत या टोळक्याने त्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.हल्ल्यानंतर टोळक्याने परिसरातील तीन रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच जवळील सोसायटीत पार्क असलेल्या पाच दुचाकींची तोडफोड केली. या घटनेमुळे खेसे पार्क परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
Munde |Deshmukh |Somnath |Doctor या चौघांचं काय चुकलं? ज्यांचं स्वप्न अकाली भंगलं! यांना न्याय कधी?
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.गेल्या काही महिन्यांत किरकोळ वादांवरून टोळक्यांकडून शस्त्रहल्ले व वाहनांची तोडफोड करण्याच्या (PUNE VIMANNAGAR NEWS) घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.अद्यापही वानवडी, काळे वस्ती, हडपसर परिसरात अशाच घटना घडल्या होत्या.स्थानिक नागरिकांनी अशा टोळक्यांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.