Pune Video

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

843 0

पुणे : पुण्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. यामध्ये घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर अचानक बिबट्याने हल्ला (Pune Video) केला. ही संपूर्ण हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

काय घडले नेमके?
आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी- जारकरवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणारे उद्योजक अविनाश बाबुराव ढोबरे यांच्या घरासमोर एक कुत्रा झोपला होता. हा कुत्रा रात्रीच्या सुमारास अचानक गायब झाला. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पहिला असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. समोरचे दृश्य पाहून ते पूर्णपणे हादरून गेले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. कुत्र्याची शिकार केल्यानंतर बिबट्याने त्याला जबड्यात धरून ओढत नेलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!