PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED: पुण्यात दिवाळीची खरेदी सुरू असताना चोरट्यांनी सक्रियता वाढवली आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांच्या (PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED) बॅग आणि गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुळशीबाग परिसरात झालेल्या चोरीच्या एका घटनेत विश्रामबाग पोलिसांनी दोन महिला चोरट्यांना तत्काळ अटक केली आहे.
Leopard Attack Shirur: बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
१२ ऑक्टोबर रोजी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका ३८ वर्षीय महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी साडेसात हजार रुपयांची रोकड चोरी केली. अनीसा (PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED) सोहेल शेख आणि मेहराज सोहेल शेख या दोन महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन हा प्रकार केला. मात्र, चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही महिलांना पकडण्यात यश आले आणि त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली.
PUNE POLICE NEWS:-मेफेड्रॉनसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, तुळशीबागेव्यतिरिक्त पुण्यातील वारजे आणि प्रभात रस्ता भागातही महिलांना लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने हिसकावल्याच्या गंभीर घटना घडल्या (PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED)आहेत. वारजे भागात किराणा दुकानात दूध खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेकडील सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED:पुण्यात दिवाळीच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ
याचप्रकारे, प्रभात रस्ता परिसरात सकाळी रस्त्यावरून चालणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने क्षणात खेचून नेले आणि वेगाने पसार झाला. या दोन घटनांनी चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.
दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी मौल्यवान वस्तू जपून ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विश्रामबाग, वारजे आणि प्रभात रस्ता भागात झालेल्या चोऱ्यांच्या घटना लक्षात घेता, पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून, गस्त वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.