Pune Swargate Mephadrone Arrest: शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीवर पुन्हा एकदा पोलिसांनी मोठा आघात केला आहे. स्वारगेट परिसरात खडक पोलीसांनी दरम्यानची गस्त करताना मेफेड्रोन विक्रीसाठी (Pune Swargate Mephadrone Arrest) आलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांना त्यांच्या ताब्यातून तब्बल १ लाख २३ हजार ६०० रुपयांचे मेफेड्रोन आणि एक कोयता जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडक पोलीसांनी स्वारगेट परिसरात गस्तीदरम्यान दोन तरुणांना संशयास्पदरीत्या थांबलेले पाहिले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीसांनी तात्काळ कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या पिशवीतून सहावं ग्रॅम मेफेड्रोन (एमडी ड्रग) आणि एक कोयता सापडला.
अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत – अब्दुल अकबर खान (वय १९, रा. दत्तवाडी) आणि धीरज उर्फ गुड्डू नीलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा). दोघांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Swargate Mephadrone Arrest) करण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या कारवाईचा उद्देश शहरातील युवकांना घातक ड्रग्जपासून दूर ठेवणे आणि त्यांच्यावर संभाव्य अपायकारक परिणाम होण्यापासून वाचवणे हा आहे.
JAIN BOARDING LAND DEAL CANCEL जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द;बिल्डर विशाल गोखलेंची माघार
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः गांजा आणि मेफेड्रोनसारख्या घातक पदार्थांपासून तरुणांना वाचवण्यासाठी (Pune Swargate Mephadrone Arrest) पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये शहरातील विविध भागांत गस्त वाढवणे, शाळा–कॉलेज परिसरांमध्ये जनजागृती करणे आणि संशयित व्यक्तींची नियमित तपासणी करणे यांचा समावेश आहे. खडक पोलीसांनी सांगितले की, शहरातील युवकांना अशा प्रकारच्या अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सार्वजनिक सहकार्य आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचालींविषयी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कारवाईने पुण्यातील ड्रग्जच्या विक्रीवर पोलिसांची कटाक्षाने नजर असल्याचे दाखवून दिले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा कठोर कारवाईमुळे युवकांमध्ये गैरवर्तन रोखण्यासाठी आणि शहरात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी मोठा बदल होऊ शकतो.