PUNE SHIVAJI NAGAR COURT NEWS: शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी एका व्यक्तीने न्यायालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याच समोर आला होता. पण आता (PUNE SHIVAJI NAGAR COURT NEWS) आत्महत्येमागचं एक धक्कादायक कारण आता समोर आलं.. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बुधवारी 15 ऑक्टोबरच्या दुपारी 11.40 ते 12.10 च्या सुमारास धक्कादायक घटना घडली. वडकी हडपसर येथील नामदेव यशवंत जाधव या 61 वर्ष व्यक्तींने 27 वर्ष न्यायालयात लढा देऊनही न्याय मिळत नसल्याने न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली..
DHULE NEWS: धुळे जिल्ह्यात छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; व्हिडिओमुळे १४ जणांवर गुन्हा दाखल
पण त्याच्या आत्महत्येनंतर या मागचं धक्कादायक कारणही आता समोर आलं.. मृत नामदेव यशवंत जाधव यांच्या जवळ एक चिठ्ठी आणि आधार कार्ड आढळलं..त्या चिठ्ठीत त्यांनी कौटुंबिक आणि (PUNE SHIVAJI NAGAR COURT NEWS) मालमत्तेशी संबंधित वादाचे कारण नमूद केलं.. चिठ्ठीत नमूद केल्यानुसार मयत नामदेव यशवंत जाधव यांचे वडिलांनी त्यांच्या संमतीशिवाय काही जागेची विक्री केली होती. त्या संदर्भात त्यांनी 1997 पासून न्यायालयात दावा दाखल केला होता. तसेच वडिलांनी काही मालमत्ता मुलांना देण्यास सांगितलं तरीही कागदपत्रांमध्ये नामदेव यशवंत जाधव नाव नोंदवले गेले नव्हते. त्यांच्या भावानही संबंधित जागेवर बांधकाम केलं .. त्या बांधकामावर मयत नामदेव यशवंत जाधव यांनी स्थगिती घेतली होती..
RAVINDRA DHANGEKAR | दिवाळीच्या निमित्ताने रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर यांच्याशी खास गप्पा
पण नंतर न्यायालयाने ती स्थगिती रद्द केली. या सर्व कारणांमुळे न्याय मिळत नसल्याने आणि कोर्टाची तारखेवर तारीख मिळत असल्याने नामदेव यशवंत जाधव यांनी आत्महत्या केली.. वडिलांनी न सांगता (PUNE SHIVAJI NAGAR COURT NEWS) परस्पर जमीन विकली आणि भावने संबंधित जागेवर बांधकाम करत फसवल्याने आणि सत्तावीस वर्ष न्यायालयात न्याय मिळत असल्याने निराशेतून नामदेव यशवंत जाधव यांनी आत्महत्या केली.