Pune News

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांना मुंबईमधून केली अटक

1340 0

पुणे : देशात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पुणे पोर्शे कार प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालचा मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचं मुंबई कनेक्शन समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी मुंबईतून आता दोघांना अटक केली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अशपाक मकानदार, अमर गायकवाड अशी दोघांची नावे असून त्यांना पुणे क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. या दोघांची आता पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!