PUNE PORSCHE CAR ACCIDENT: कारचालक आरोपीची आई शिवानी अग्रवालला अखेर अटक

362 0

कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.

कार चालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्या प्रकरणात सध्या दोन डॉक्टर आणि एक शिपाई अटकेत आहे. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलले असले तरी ते कुणाचे आहेत याचा शोध घेतला असात ते एका महिलेचे आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक वेग-वेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी मुलाच्या आईवर संशय आल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला. या काळात मुलाची आई शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेत अखेर पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना अटक केली आहे.

१९ मेच्या मध्यरात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर येथए एका बाईकला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्याला अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. तसेच पोलिसस स्टेशनमध्येही त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नागरिक संतापले, समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त झाला.

त्यानंतर याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करताना पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आधीच कोठडीत आहेत. तर आता त्याची आईदेखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!