ससून हॉस्पिटल ड्रग्सप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

567 0

ससून ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

फरार आरोपी ललित पाटील याचा कसून शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून ललित पाटील प्रकरणात तीन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रकरणाची दीड महिन्यात चौकशी पूर्ण केली जाणार आहे. 3 वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची दीड महिना चौकशी करणार आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ससून रुग्णालय प्रकरणी रुग्णालयात बंदोबस्तासाठी असणारे गार्डही रडारवर आले आहे. प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून 360 पोलीस गार्डची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात या चौकशीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

Share This News
error: Content is protected !!