PUNE POLICE LAND SCAM वाघोलीतील जमीन घोटाळा प्रकरणात आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे? PUNE POLICE LAND SCAM
2022-23 मध्ये वाघोली येथील 10 एकर जमीन हडपण्यासाठी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वात कट रचण्यात आला.
अर्चना पटेकर या महिलेला अर्पणा यशपाल वर्मा असे नाव धारण करायला सांगून, तीच मूळ जागा मालक आहे, असे भासवण्यात आलं.
अपर्णा हिच्या नावाचे बनावट दस्त नोंदणीसाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करुन जमिनीचे खरेदी खताचे दस्त तयार केले.
हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे यांनी जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी केली असल्याचे समोर आले.
यात पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाचाही संबंध असल्याचे सांगितलं जातं आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा या चौघांवर चंदननगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोलीतील 10 एकर जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
त्या अनुषंगाने चंदन नगर पोलिसांचे एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांची सखोल चौकशी सुरू असून बनावट कागदपत्रे, संगनमत आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा अशा प्रकरणात सहभाग असल्याने पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा आहे. नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जातं आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि त्यांच्या इतर सहकार्यांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
सरन्यायाधीश Bhushan gavai यांचा पहिला निर्णय अन् Narayan Rane यांना धक्का; नेमकं प्रकरण काय?