कोयता गँगविरोधात पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार अँक्शन मोडवर; दिले ‘हे’ मोठे आदेश

456 0

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

16 ते 18 वर्षाच्या दरम्यानची मुले देखील गुन्हेगारी करताना दिसत आहेत. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीवर असणार्‍या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या अल्पवयीन मुलांवर कारवाई देखील होणार असून त्यांचे समुपदेशन देखील केले जाणार आहे. आगामी 2 ते 3 महिन्यात याचे परिणाम पाहायला मिळतील.

Share This News
error: Content is protected !!