आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या बुकीना पुणे पोलिसांनी केली अटक

2340 0

पुणे: पुण्यातील कोंढव्यामधील आयपीएलच्या मॅचेसवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेणार्‍या बुकींवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने  शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. 

त्यामध्ये तब्बल 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कॉम्पयुटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रूपये रोख असा एकुण 5 लाख 12 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. एकाचवेळी सट्टा घेणार्‍या 9 जणांना अटक झाल्याने क्रिकेट बेटिंगच्या बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट  यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Share This News
error: Content is protected !!