पुणे : राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे (Pune News) यांच्या पथकाकडून काल रात्री एक मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकसुद्धा केली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहन तपासणी सुरु होती. यादरम्यान पोलिसांचे लक्ष दहाचाकी कंटेनरकडे गेले. तपासणीदरम्यान संशय आल्याने कसून शोध घेण्यात आला. चौकशी केली असता चालकावरचा संशय अजून बळावला. यानंतर पोलिसांनी गाडीची झडती घेतली. गाडीच्या पुढील बाजूस ठेवण्यात आलेल्या पेंट कॅनमध्ये एक हजारांहून अधिक दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेली दारू गाडीच्या किमतीसह तब्बल एक कोटी रुपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालकाकडे आवश्यक वाहतूक पास, परवाना किंवा मद्याच्या कायदेशीर वाहतुकीशी संबंधित कोणतीही संबंधित कागदपत्रे नव्हती. तस्करीप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज शिंदे व एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका
Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता
Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण
Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …
Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट