pune crime

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

703 0

Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून पुण्यातील एका जत्रेत आकाश पाळण्यात बसताना 9 वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुण्याच्या कात्रज परिसरातील जत्रेत ही घटना घडली आहे.

कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने फनफेअर भरवण्यात आलेल्या आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार या 9 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोखंडी जाळीला हात लागताच शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फन फेअरचच्या आयोजक तसेच आकाश पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल असे भारती विद्यापीठतील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!