पुणे : पुण्यातील (Pune News) खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या कळमोडी धरण परिसरात असणाऱ्या घोटवडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोनिका सुरेश भवारी (वय 13) असे पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली मात्र पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यास उशिरा झाल्याने हि घटना समोर आली आहे.
काय घडले नेमके?
खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या परसुल खोपेवाडी येथे मोनिका ही रानामध्ये जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. जनावरे दिवसभर या परिसरात चरत होती. सायंकाळ झाली जनावरे चरून घरी आली. मात्र, मोनिका आली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जनावरे चारत असलेल्या परिसरात जाऊन पाहिले त्यावेळी त्यांना तिचे जरकिन (स्वेटर) आणि चप्पल आढळून आली. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पाझर तलावातून मोनिका हीचा मृतदेह बाहेर काढला.
यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे सोपवला. मृत मोनिका ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. मोनिका कुटुंबात सर्वांत लाडकी होती. तिला आई वडील, मोठी बहीण, भाऊ असा परिवार आहे. मोनिकाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सगळ्यांच्या लाडक्या मोनिकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोनिका पाझर तलावाजवळ का गेली होती? की आणखी काही कारण होते का? याबाबतचा तपास खेड पोलिस करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?
Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या
Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान
Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे