पुणे : पुण्यात (Pune News) वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहता पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. तरीदेखील गुन्हेगार याला जुमानताना दिसत नाही आहेत. उलट ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. आज सकाळच्या सुमारास पुण्यातील (Pune News) वारजे माळवाडी परिसरात 9-10 जणांच्या टोळीने पोलिसांवरच गोळीबार केला आहे.
या गोळीबाराच्या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर
काय घडले नेमके ?
आज दिनांक 08/07/2023 रोजी 01.00 वाजण्याच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट 03 चे अधिकारी व कर्मचारी, एसीपी वन हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूल च्या जवळ आठ ते दहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले .
नमूद संशयित इसमांना ACP तांबे , PI बहिरट, PSI पवार व युनिट तीन कडील स्टाफ यांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस स्टाफ यांच्या दिशेने अग्नीशस्त्र रोखले. त्यानंतर आरोपींनी पोलीस स्टाफ च्या दिशेने फायर करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस स्टाफ ने आरोपींच्या दिशेने फायरींग केले , यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने PC कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पकडले .
त्यानंतर इतर चार ते पाच आरोपी यांच्यावर पोलिसांच्या कडून फायरिंग केली असता ते आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींची शोध चालू आहे.तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार राऊंड दोन लोखंडी कोयते कटावणी स्क्रू ड्रायव्हर हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.