Pune Nashik Highway Accident

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक हायवेवर क्रुझरचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

553 0

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण (Pune Nashik Highway Accident) अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

कसा घडला अपघात?
क्रुझर गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मृत पावलेले व्यक्ती हे एकाच कुटुंबातील आहेत. पंकज खंडू जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी आहिरे (वय 50) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. नाशिक, अशी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पुणे – नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास माहमर्गावर धुके अधिक होते. त्यात वेगात असणाऱ्या क्रुझर गाडीने पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Share This News

Related Post

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा…
Dasra

Kasba Ganapati : श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शाही दसऱ्याचे आयोजन

Posted by - October 25, 2023 0
पुणे : विजयादशमीच्या निम्मित श्री कसबा गणपती (Kasba Ganapati) चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक शस्त्रपूजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम…
Jalgaon News

Jalgaon News : खेळताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 14, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत…

सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा थरार ; टोळक्याकडून एकाचा खून

Posted by - October 1, 2022 0
पुणे : सिंहगड रोड परिसरातील न-हे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *