Pune Manchar Accident

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

468 0

पुणे : पुण्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात (Pune Manchar Accident) झाला आहे. कार-टेम्पो-कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा या ठिकाणी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून स्विफ्ट कारचा चालक व टेम्पोचा चालक थोडक्यात बचावला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत मात्र, हे मृत तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याचे समजत आहे.

काय घडले नेमके?
आज सकाळी एका स्विफ्ट कारमधून हे तीन तरुण पुणे नाशिक मार्गाने जात होते. यावेळी सकाळी मंचर जवळ त्यांची कार आली. यावेळी पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (GJ 01 WB 1737) हा बंद अवस्थेत उभा होता. या कंटेनरला टेम्पो (MH 12 QG 3351) आणि स्विफ्ट कार (MH 15 DT 0295) जाऊन धडकले. ही धडक एवढी भीषण होती की स्विफ्ट गाडीने पेट घेतला. यात ही गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे.

स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होळपळून मृत्यू झाला. तर स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक या अपघातातून बचावले आहेत.हा अपघात एवढा भयंकर होता की कार जळून खाक झाली आहे तर टेम्पोचा चक्काचूर झाला आहे.मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारी या आपघताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!