Pune Fire News

Pune Fire News : लोणावळ्यात दारूच्या गोडाऊनला भीषण आग

916 0

पुणे : लोणावळ्यामधून (Pune Fire News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नीलकमल थीएटरसमोर असलेल्या एका दारूच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी धावपळ उडाली. धक्कादायक म्हणजे या गोडाउनच्या शेजारी एक हॉस्पिटल देखील होते. मात्र अग्निशामक दलाने प्रसंगावधान राखत वेळीच पाऊल उचलल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत लाखोंची दारू जळून खाक झाली आहे.

काय घडले नेमके?
लोणावळा येथील मुख्य बाजारपेठेत दारुचा साठा असलेल्या गोडाऊन आहे. या गोडाऊनला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोंची दारू जळून खाक झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लोणावळ्यातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एका बिल्डिंगच्या तळ मजल्यावर हे गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या शेजारील एक भिंत सोडून हॉस्पिटल आहे. मात्र,अग्निशामक दलाने वेळीच प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Share This News
error: Content is protected !!