PUNE KARAD IT GIRL NEWS:पुण्यात IT इंजिनियर तरुणीला अँक्टिंगचा मोह नडला.. ‘डायरेक्टर’कडून रेप… सॉरी…पुन्हा जबरदस्ती…संपूर्ण A TO Z स्टोरी

83 0

PUNE KARAD IT GIRL NEWS: सिनेमा आणि शॉर्ट फिल्मच्या नावाखाली तरुणींना चमकदार भविष्याची स्वप्न दाखवून फसवले जाते, अशी अनेक प्रकरणं आपण ऐकतो.

पण आता अशीच धक्कादायक घटना पुण्यात आणि कराडमध्ये घडली…

एका IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला अल्बम सॉंगमध्ये काम मिळेल या आमिषाने बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

TOP NEWS MARATHI : PUNE KARAD IT GIRL NEWS:फिल्म शूटिंगच्या नावाखाली ‘आयटी’ मधील तरुणीवर कराडमध्ये अतिप्रसंग

चला तर मग… नेमकी ही घटना काय?.. कशी घडली? आणि आरोपीने कोणत्या पद्धतीने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवलं पाहुयात..

पीडित 28 वर्षीय तरुणी पुण्यातील आयटी कंपनीमध्ये काम करते..

ही तरुणी पुण्यात नोकरीनिमित्त आलेली होती. तिने 1 वर्षापूर्वी ‘ओम तेजा प्रोडक्शन ’ नावाचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन केला होता.

या ग्रुपमध्ये शॉर्ट फिल्मसाठी मुलीची आवश्यकता असल्याची पोस्ट आरोपी विशाल दिपक याने टाकली होती…

MAKRAND JADHAV PATIL: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट;अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

फिर्यादी तरुणीला अभिनयाची आवड असल्याने तिने ग्रुपमध्ये आरोपीकडे यासंदर्भात विचारणा केली.

त्यावेळी आरोपी विशाल दिपक याने स्वतःच्या मोबाईलनंबरवरून अल्बम सॉंगशुट साठी रिक्वायरमेंट पाठवली होती..

. आरोपी आणि फिर्यादी तरुणीमध्ये कामासंदर्भात बोलणी झाली…

त्यानंतर फिर्यादी तरुणी शुटींग करीता तयार झाली.त्यानुसार अल्बम सॉंगची शुटींग कराडला ठरली…

ठरल्याप्रमाणे फिर्यादी तरुणी 7 जून 2025 रोजी कराडला गेली. आरोपी विशाल हा तिला घेण्यासाठी गेला होता.

त्याच्या मोटारसायकलवरून ते दोघे कराडमधील गजानन सोसायटी येथे गेले. तेथे गेल्यावर आरोपीने हे त्याचंच घर असल्याचे पीडितेला सांगितले…

त्या घरामध्ये आरोपीचा भाऊ व वहिनी होते… त्यानंतर, 8 जून 2025 रोजी सकाळी विशाल व अतुल जाधव हे कराडमधील शामगाव घाट येथे शुटींग करण्याकरीता गेले… अतुल जाधव शुटींग करण्याचे काम करत होता…

SANT DNYANESHWAR MAHARAJ SUVARNA KALASH: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

दिवसभर अल्बम सॉंगचे शुटींग करुन संध्याकाळी सर्वजण आरोपी विशालच्या घरी गेले… त्यानंतर पुन्हा 9 जून रोजी सकाळी हे तिघेही अल्बम सॉंगचे शुटींग करण्याकरीता सुरली घाटावर गेले… सायंकाळी शुटींग संपल्यानंतर आरोपी विशालने फिर्यादीला सोबत घेतले…

आणि तिला स्वतःच्या घरी न नेता.. सूर्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शुभम रेसीडेन्सीमध्ये नेले…

त्यावेळी या फ्लॅटमध्ये कोणीही नव्हते…पीडित तरुणीने फ्लॅट कोणाचा आहे

अशी विचारणा केली असता आरोपीने अतुल जाधव याचा फ्लॅट असल्याचे सांगितले…

थोड्या वेळाने काम काढून अतुल जाधव निघून गेला… त्यानंतर, आरोपी विशालने फिर्यादी तरुणीसोबत लगट सुरु केली…

त्याचबरोबर शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. फिर्यादी तरुणीने त्याला नकार देत विरोध केला..

मात्र नराधम आरोपीने तिचे कपडे फाडून बलात्कार केला. काही वेळाने अतुल जाधव घरी परत आला…

फिर्यादी तरुणीने त्याला घरी जायचे आहे असे सांगितले…

आरोपीच्या घरी जाऊन पीडित तरुणीने बॅग घेतली आणि बसने पुण्याला परत आली…

घटनेनंतर आरोपी विशालने तिला फोन करून सॉरी म्हणून लवशिपमध्ये राहण्याबाबत विचारले…

तिने त्याला केवळ फेंडशिपमध्ये राहून नॉर्मल बोलूया असे सांगितले…

परंतु, आरोपीने तिला 15 ऑगस्ट रोजी फोन केला..‘मला पुण्यात भेट, तु मला भेटली नाहीस तर मी तुझ्या क्लासमध्ये आणि कराडमध्ये

तुझ्या ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन बदनामी करीन.’ अशी धमकी दिली…. दरम्यान, या आरोपीने काही जणांकडे जाऊन तरुणीची बदनामी केली…

त्याच दिवशी त्याने तरुणीला टैक्स मेसेज केला …‘सॉरी माझे चुकले… मी पुण्यात येत आहे, तुला सॉरी बोलायला.’ असा मेसेज केला…

त्यानंतर आरोपीने वारंवार फोन व मेसेज करून भेटण्यासाठी तगादा लावला…

तसेच, अश्लील शूट केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली…

17 ऑगस्ट रोजी सकाळी हि तरुणी कामावर जात असताना आरोपी विशाल हा तिला आपला पाठलाग करीत असताना दिसला…

त्याने तिला गाठत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला… घाबरलेल्या तरुणीने रस्ता बदलून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला…

त्यानंतर तिने पोलिसांच्या 112 नंबरवर कॉल केला. त्यानंतर, आरोपी तिथून पसार झाला.

त्यानंतर या तरुणीने चंदन नगर पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली..

या आरोपी विरोधात सध्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो गुन्हा कराड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला…

Share This News
error: Content is protected !!