Pune News

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

456 0

पुणे : आज पुणे (Pune Firing) पुन्हा एकदा हादरलं आहे. आज पहाटे येरवडा परिसरात दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात पुण्यात चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे समजत आहे.

काय घडले नेमके?
आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी त्याला लागली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहेत. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. जुना भांडणाचा वाद होता दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. विकी याच्या पोटात गोळी लागली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. या सलग गोळीबारामुळे गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!