Murder

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

406 0

पुणे : पुण्यातील (Pune News) बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी पळ काढून राज्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातुन अटक करण्यात आली.

नईम शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख हा महिलेचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी या महिलेने हत्या झालेल्या नईम शेखसोबत विवाह केला होता. त्यानंतर ते दोघेजण एकत्र राहत राहू लागले. मात्र पत्नीने दुसरा विवाह केल्याचे कळताच कलाम नईमवर चिडला आणि याच रागातून त्याने नईमच्या हत्येचा कट रचला.

कसा काढला काटा?
कलामने नईमवर लक्ष ठेवण्यात सुरुवात केली होती. शुक्रवारी संध्याकाळी बुधवारी पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ कलाम थांबला होता. काही वेळाने नईम तिथे आला. तितक्यात कलामने खिशातला वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात नईम गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच नईमचा मृत्यू झाला होता.यानंतर कलाम तिथून पसार झाला. कलाम त्याच्या मित्रासोबत पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कलामला त्याच्या मित्रासह रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

Posted by - August 20, 2022 0
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा…
Thane News

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Posted by - December 28, 2023 0
ठाणे : ठाण्यातून (Thane News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलिसांना आल्याने परिसरात एकच खळबळ…

हळदीच्या कार्यक्रमात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवाला ठोकल्या बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022 0
औरंगाबाद- हळदीच्या कार्यक्रमात मित्राच्या आग्रहास्तव हातात तलवारी, जंबिया घेऊन नाचणे अतिउत्साही नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात घडलेल्या या…

पुण्यातील कोयता गँगविरोधात खासदार अमोल कोल्हे मैदानात; थेट गृहमंत्र्यांना लिहलं पत्र

Posted by - December 14, 2022 0
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग सक्रिय होत असून या गँगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या गँग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *