Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

586 6

पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीला जंगलात नेऊन तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
सोमनाथ सखाराम वाघ असे पतीचे तर सुवर्णा सोमनाथ वाघ असे मृत पत्नीचे नाव आहे. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती सोमनाथने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

घटनेच्या वेळी दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. त्यानंतर उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. त्यानंतर दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी सोमनाथने पत्नी सुवर्णाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आणि यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!