Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

534 0

पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगर रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता हा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाला.

काय घडले नेमके?
आदील शेख आणि पाहद शेख दोघेही राहणार लातूर अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच हे रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यातील आदिलचा जागीच मृत्यू झाला. तर पाहदचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. यामध्ये ट्रक चालकाने मद्यप्राशन केले होते. अपघातानंतर चालकाने दुचाकी 800 मीटर फरफटत नेली. आदिल आणि पाहद यांचा मित्र अफान शेख याला गावी जायचे होते. त्यामुळे ते दोघे त्याला पुणे स्टेशनला सोडवायला निघाले होते. यात अफान शेख हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विमाननगर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!